योजना व प्रकल्प
प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा
राज्यात कोविड मुळे सन2020 मध्ये लॉकडाउन असल्याने व सन2021 मध्ये अमरावती विभागातील ड्रोन सर्व्हे चा कार्यक्रम सूरू झाला असल्याने जिल्हयातील मोजणी प्रकरणे मोठया प्रमाणात प्रलंबीत होती. माहे मार्च 2022 अखेर सदर प्रलंबीत प्रकरणांची संख्या 4720 इतकी होती. जिल्हयातील उपलब्ध भूकरमापकाच्या सेवा वापरून सदर प्रकरणे निर्गत करण्यास साधारण पणे 1 वर्षाचा कालावधी लागणार होता.
तथापी प्रलंबीत प्रकरणांचा त्वरीत निपटारा करून अर्जदारांना मोजणी नकाशा सत्वर मिळणेकामी जिल्हास्तरावर मोजणी प्रकरणाचे नियोजन करण्यात आले व माहे नोव्हेंबर2022 पर्यंत सदर प्रकरणे निकाली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
त्यानुसार माहे मे 2022 मध्ये जिल्हयातील भूकरमापक यांच्या व्यतीरिक्त कार्यालयातील अन्य सर्व कर्मचा-यंाच्या सेवा वापरून एकूण 1398 प्रकरणे मोजुन निकाली करण्यात आली.