योजना व प्रकल्प
ई - फेरफार
सदर योजने अंतर्गत उप अधीक्षक भूमि अभिलेख, तहसिल कार्यालय व नोंदणी कार्यालय हे दुरसंचार निगमच्या VPN प्रणालीदवारे एकमेकास जोडून ई -फेरफार हा कार्यक्रम राबविण्याचा आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील उपरोक्त तिन्ही कार्यालयास तीन संगणक संच व त्याअनुषंगाने आवश्यक असलेले संगणक साहित्य शासनाकडून पुरविण्यात आलेले असून MPLS Connectivity 16 तालुक्याची झाली आहे.
ई- फेरफार प्रभावीपणे राबविण्याकरिता संबधीत कर्मचा-यांचे Digital Singnature प्राप्त करून घेण्यात आले आहे. सदरचा डेटा e PCIS अज्ञावलीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. e PCIS अज्ञावलीमध्ये नांदेड जिल्हातील एकुण मिळकत पत्रिका 15657 पैकी 152016 Digital Signature झाले आहेत. डिजीटल साईन झालेल्या मिळकत पत्रिका एकुण संख्या 152657 पैकी 152013 मिळकत पत्रिका डिजीटल साईन झालेल्या आहेत सदर कामाची 99.57 % ईतकी झालेली आहे.