जिल्ह्याची माहिती

अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख

         सहकारातून ग्रामोध्दार व संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा अहमदनगर  जिल्हा महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला आहे. क्षेञफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या या जिल्हयाचे एकूण भौगोलिक क्षेञ १७,०४८ चौ.कि.मी. असून ते राज्याच्या क्षेञफळाच्या ५.६ टक्के आहे.  अहमदनगर जिल्हा १८.२ अंश ते  १९.९ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.९ अंश ते ७५.५ अंश पूर्व रेखांश दरम्यान स्थित आहे. हा जिल्हा गोदावरी खोरे  आणि  भीमा खोरे यामध्ये  वसलेला आहे. जिल्ह्याची लांबी  २०० किमी आणि रुंदी  २१० किमी आहे.. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ४५,४३,१५९ आहे.    

     अहमदनगर शहर मध्ययुगीन काळापासून प्रसिद्ध आहे. ही अहमदनगरच्या निजामशाही राज्याची राजधानी होती. अहमदनगरच्या निजामशाही राजघराण्याचे संस्थापक मलिक अहमद यांनी १४९४ मध्ये सदर शहर वसवले.  त्यांच्याच नावावरून त्यांनी या शहराचे नाव अहमदनगर ठेवले. सन १८१८ मध्ये अहमदनगर जिल्ह्याची निर्मिती  झाली.    

        राजा तोडरमल यांनी विकसित केलेली महसूल पध्दत दक्षिणेमध्ये सुधारणांसह राबवण्याचे श्रेय अहमदनगरच्या निजामशाहीतील वझीर मलिक अंबर याला जाते. मलिक अंबर याने कसणाऱ्याचे मालकी हक्क मान्य करून ते विशिष्ट कालावधीसाठी संरक्षित केले. त्यांनीच पहिल्यांदा महसूल गोळा करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब केला. मलिक अंबर याने प्रत्यक्ष पिकाखालील क्षेत्र व त्याचे  उत्पन्न यावर आधारित जमीन महसूल आकारणी केली. 

     अहमदनगर जिल्ह्यात “रयतवारी” ही  प्रचलित जमीन महसूल प्रणाली अस्तित्वात असून  ती संपूर्ण सर्वेक्षण, जमिनीचे  वर्गीकरण आणि क्षेत्राची महसूल आकारणी यावर आधारित आहे.  जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे सन १८४३ ते १८५२ या कालावधीत मूळ महसूल सर्वेक्षण आणि जमाबंदी झाली आहे. पहिली रिव्हीजन सेटलमेंट सन १९१३ ते १९२३ दरम्यान पूर्ण झाली. तिसरी रिव्हीजन सेटलमेंट कोपरगाव आणि संगमनेर तालुक्यांमध्ये सन १९२३ ते १९३४ दरम्यान सुरू करण्यात आली. तेव्हापासून जमीन महसूल दरांमध्ये सुधारणा करण्यात आली नाही.


अहिल्यानगर प्रशासकीय रचना

जिल्हा भूमी अभिलेख प्रमुख

जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अहमदनगर - वर्ग I 

मुख्यालय 

अहमदनगर 

कार्यालयाचा पत्ता

नवीन प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्रासमोर , सावेडी, अहमदनगर

संपर्क क्रमांक 

०२४१ – २४२२९४३

 E mail id

Slr_ahmednagar@yahoo.in
dslrahmednagar12@gmail.com 

जिल्हा तालुक्यांची संख्या

१४

तालुका स्तरावरील कार्यालयांची संख्या 

१५

तालुका स्तरावरील कार्यालयांच नाव 

उपअधीक्षक भूमी अभिलेख-वर्ग II

नगर भूमापन अधिकारी


अहिल्यानगर जिल्ह्यावर एक दृष्टीक्षेप

जिल्हा  

 अहमदनगर 

एकूण क्षेत्र

१७,४१,२७१ हेक्टर

लोकसंख्या

४५,४३,१५९

तालुके: 

१४

एकूण गांवे

१५८४

प्रमुख नद्या

मुळा, प्रवरा, मुठा, गोदावरी, भीमा, सीना

पर्यटन स्थळे

हरिश्चंद्रगड आणि  कळसूबाई शिखर – अकोले , हेमाड पंथी मंदिर – राहुरी , रेहकुरी काळवीट अभयारण्य – कर्जत, रांजण खळगे निघोज (पारनेर)

ऐतिहासिक ठिकाणे आणि किल्ले

ढोकेश्वर लेणी, खर्डा किल्ला – जामखेड, अहमदनगर  किल्ला, पेडगाव किल्ला – श्रीगोंदा, अहिल्यादेवी जन्मस्थळ  - चौंडी(जामखेड)

तीर्थक्षेत्रे

शिर्डी, शनी शिंगणापूर, देवगड, मढी, मोहटादेवी पाथर्डी, सिद्धटेक, पिंपळनेर, नेवासा, पुणतांबा

धरणे

भंडारदरा, मुळा, निळवंडे

साखर कारखाने

१९

आदर्श गावे

हिवरे बाजार – अहमदनगर, राळेगण सिद्धी – पारनेर