जिल्ह्याची माहिती

पालघर जिल्ह्याची ओळख

      

महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील दिनांक 31/07/2014 चे शासन अधीसूचने अन्वये पालघर जिल्हा हा मुळच्या ठाणे जिल्हयातून दि.01/08/2014 रोजी नवनिर्मीत झांलेला आहे. पालघर जिल्हयामध्ये पालघर, जव्हार, वसई, वाडा, मोखाडा, डहाणू, विक्रमगड व तलासरी  असे एकूण आठ तालुके आहेत. पालघर जिल्हयाला ऐतिहासीक वारसा लाभला आहे. पालघर जिल्हया मध्ये जव्हार येथे ऐतिहासिक राजवाडा आहे. तसेच वसई येथे अर्नाळा किल्ला आहे. पालघर जिल्हयामध्ये कुणबी, भंडारी, वारली (आदिवासी), कातकरी, मल्हार कोळी, वंजारी, वडवळ, माळी (सोरठी) या प्रमुख जाती आहेत. ‍आदिवासी लोकांच्या जीवनशैलीचे चित्रण करणारी  वारली चित्रकला (पेंटीग) प्रसिध्द आहे.

तसचे पालघर जिल्हयाला एकूण 112‍ कि.मी. सागरी किना-याची  लांबी लाभलेली आहे.

पालघर जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ  4696.99 चौ.कि. मी. आहे.

 


पालघर जिल्ह्यावर एक दृष्टीक्षेप

भौगोलिक रचना

पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या   उत्तररेस पसरलेला  आहे.प्रशासकिय केंद्र पालघर हे आहे.पालघर जिल्हा हा कोकण प्रशासकिय विभागात येतो. पालघर जिल्हयाच्या पूर्वेला व ‍दक्षिणेला  ठाणे जिल्हा पश्चिम दिशेला विस्तीर्ण समुद्रकिनारा  लाभलेला आहे. तसेच उत्तेरेस गुजरात राज्याची सिमा आहे.

भौगोलिक क्षेत्रफळ   

पालघर जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ   

4696.99 चौ. कि.मी.

भौगोलिक रचना

 

पालघर जिल्हयाचे भौगोलिक स्थान

अक्षांश – 19.697029  N रेखांश- 72.771249 E

समुद्र सपाटीपासूनची उंची

 

तपामान  आणि   पर्जन्यमान

 

पालघर जिल्हयातील हवामान

उष्ण व दमट

पालघर जिल्हयातील सरासरी पाऊस

सरासरी 2458 मि मी

किमान तापमान

8.3 डीग्री सेंटीग्रेड

कमाल तापमान

40.6 डीग्री सेंटीग्रेड

ओलीत अंतर्गत क्षेत्रफळ

 

सिंचन क्षेत्र

356000 हे.आर.

मोठे प्रकल्प

सुर्या प्रकल्प

बिगरशेती क्षेत्र  

90,90,90000 हे.आर

जंगल क्षेत्र

330000 हे.आर.

पडीक जमीन / खाडी खाजण

21000 हे.आर.

पालघर जिल्हयाची लोकसंख्या जनगननेनुसार

 

स्त्री

 1444337

पुरुष

1545779

एकूण

2990116

साक्षरता

72.23 %

 


पालघर प्रशासकीय रचना

 प्रशासकिय रचना

जिल्हा भूमि अभिलेख प्रमुख

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख

मुख्यालय

पालघर

कार्यालयाचा पत्ता

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पालघर यांचे कार्यालय,

 प्रशासन इमारत-अ, रुम नं.006, तळ मजला, पालघर-

बोईसर रोड, कोळगांव, तालुका व जिल्हा-पालघर

पिन -401404

 

संपर्क क्रमांक

02525-256001                                   

इ मेल आयडी

dslrpalghar@gmail.com.

आधिकार क्षेत्र

पालघर जिल्हा

तालुक्याची संख्या

08

अधिनंस्त अधिकारी संख्या

08

तालुका स्तरावरील कार्यालयाची संख्या

08

तालुका येथील कार्यालयाचे नाव

उप अधीक्षक भूमि अभिलेख

 


पालघर नगरभूमापन

नगर भूमापन  विभाग

 नगर भूमापन महसूल संहितेच्या  तरतुदीनुसार  सुरु करण्यात आलेल्या शहर सर्वेक्षणाच्या  देखभाली साठी  आणि   नकाशे यासह अभिलेख्  आणि श्हर भूमापन क्षेत्राच्या महसूल प्रशासनाला  मदत करण्यासाठी  परिरक्षण भूमापक  हे कर्मचारी  जबाबदार  आहेत.  पालघरजिल्हयातील खालील महत्वाच्या शहरामधील मिळकतीचा तपशिल खालीलप्रमाणे

 

अ.क्र.

तालुक्याचे नाव

न.भू.योजना लागू झालेल्या गावाचे नाव

नगर भूमापन लागू झाल्याचे वर्ष

  मिळकतीची  एकूण संख्या

1

पालघर

पालघर

 -

1970

 

 

नवली

-

1970

 

 

तारापूर

-

1956

2

वाडा

वाडा

1985

2674

3

वसई

वसई

1941

5606

 

 

जूचंद्र

 

1986

4

तलासरी

 

-

लागू नाही

5

विक्रमगड

 

-

लागू नाही

6

जव्हार

जव्हार

1961

2649

7

मोखाडा

मोखाडा

1984

836

8

डहाणू

डहाणू

1935

2659

 

 

चिंचणी

 

 

 

 

 

 

 


पालघर जिल्यातील भूमी अभिलेख विभागाने साध्य केलेली प्रमुख कामगिरी

CORS ची स्थापना पालघर जिल्ह्यात 2 CORS ची स्थानके आहेत.१.वसई तालुका २. डहाणू तालुका CORS हे ROVERS नेटवर्कसाठी बेस टॉवर्स असतील जे प्रशासनाला मोजमाप प्रकरणांची शून्य प्रलंबितता प्राप्त करण्यास मदत करतील. तसेच अचूक आणि जलद मापन तयार करेल ज्यामुळे मापनातील छेडछाड रद्द होईल.