जिल्ह्याची माहिती

चंद्रपुर जिल्ह्याची ओळख

चंद्रपूर जिल्हा जो कि चांदा नावाने ओळखला जात होता ते नाव लोकपुर च्या जागेवर घेण्यात आले होते ते नाव प्रथमता इंद्पूर चे बदलले होते ते कालांतराने चंद्रपूर झाले. ब्रिटीश कालावधीत चांदा जिल्हा म्हणून संबोधले जात होते जे कि बदलवून त्याचे मूळ नाव चंद्रपूर १९६४ चे आसपास करण्यात आले. प्रदेशात इतर स्थळे प्राचीन वेळी वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्खंडा यांचा समावेश आहे. हिंदू आणि बुद्धिस्ट राज्यान्ही क्षेत्रावर बराच काळ राज्य केले. त्या नंतर गोंडराजांनी ९ व्या शतकाचे सुमारास १७५१ नंतर मराठी काळाचे सुरुवातीस राज्य केले अखेरचा राजवंशी राजा राघुशी भोसले याचा मृतू १८५३ मध्ये झाला. नागपूर आणि चंद्रपूर एकत्र ब्रिटीश साम्राज्य म्हणून घोषित केले.

१८५४ मध्ये, चंद्रपूर स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. आणि १८७४ मध्ये ती तीन तहसिली उदा मुल , वरोरा आणि ब्रम्हपुरी समाविष्टीत करण्यात आले. १८७४ , तथापि, मद्रास वरच्या गोडवाई जिल्हा कमी करून आणि चार तहसिली चंद्रपूर मध्ये जोडण्यात आले. मुख्यालय म्हणून सिरोंचा एक तहसील ठेवण्यात आली. १९८५ मध्ये एका तहसील मुख्यालयाचे मुल वरून चंद्रपूर हस्तांतरण करण्यात आले १९०५ मध्ये नवीन तहसील मुख्यालयासह गडचिरोली येथे ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर तहसील पासून जमीनदारी मालमत्ते सह हस्तांतरित करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनदारी चा लहान हिस्सा नव्याने अस्तित्वात आलेल्या जिल्ह्यास १९०७ मध्ये हस्तांतरित करण्यात आला. त्याच वर्षी क्षेत्र १५६० चौ कि. मी. तिन्ही विभागाचे नावे चरेला, अल्बक आणि नुगीर मद्रास राज्यात हस्तांतरित करण्यात आले होते.

कोणतेही जास्त बदल न करता १९११-१९५५ दरम्यान जिल्हा किंवा त्याच्या तहसिली सीमे मध्ये आल्या. १९५६ मध्ये राज्य पुन्हसंयोजना योजनेचा परिणाम म्हणुन जिल्हा मध्यप्रदेश राज्यातून बॉम्बे राज्यास हस्तातरीत करण्यात आला त्याच कालावधीत हैद्राबाद राज्याचा आदिलाबाद जिल्ह्याचा भाग राजूरा तहसील नांदेड जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्यात १९५९ मध्ये हस्तांतरीत करण्यात आले. मे १९६० महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासून जिल्हा त्याचा भाग झाला. प्रशाकीय सोईसाठी आणि औद्योगिक व शेती विकासा करिता १९८१ जणगणने नंतर जिल्ह्याची विभागणी चंद्रपूर आणि गडचिरोली अशी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात आता असलेल्या तहसिली चंद्रपूर, मुल, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, गोंडपिपरी, पोम्भूर्णा, राजुरा, कोरपना, बल्लारशा आणी जिवती यांचा समावेश आहे.


चंद्रपुर जिल्ह्यावर एक दृष्टीक्षेप

दृष्टीक्षेपात जिल्हा

विवरण

संख्या

मुख्यालय

चंद्रपूर

क्षेत्र

11,443 चौरस किमी

लोकसंख्या

2194262

लोकसंख्या घनता

155 प्रति चौरस किमी

साक्षरता प्रमाण

59.41%

तालुक्यांची संख्या

15

उपविभागांची संख्या

8

महानगर/नगर पालिका

7

गावांची संख्या

1836

लोकसभा मतदारसंघ

2

विधानसभा मतदारसंघ

6

ग्राम पंचायत

847

 

जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती

विवरण

संख्या

उत्तर अक्षांश

18-4 to 20-5 (19.57’ )

पूर्व अक्षांश

78-5 to 80-6 ( 79.18’ )

समुद्रसपाटीपासूनची उंची

189

 

क्षेत्रफळ

विवरण

संख्या

एकूण भौगोलिक क्षेत्र

11,443 चौरस किमी

लोकसंख्या क्षेत्र

880 चौरस किमी

कृषी क्षेत्र

4870 चौरस किमी

औद्योगिक क्षेत्र

32.34 चौरस किमी

वन क्षेत्र

3810 चौरस किमी

पड जमीन

550 चौरस किमी

चंद्रपूर जिल्ह्यातील बोलीभाषा

चंद्रपूर मधील बहुतांश लोकांकडून मराठी बोलली जाते. चंद्रपूरमध्ये बहुतेक गोंड लोक गोंडी भाषा बोलतात. काही लोक हिंदीमध्ये देखील अस्खलित आहेत. लोकसंख्येचा मोठा विभाग इंग्रजी देखील बोलतो.


चंद्रपुर प्रशासकीय रचना

प्रशासकीय रचना

 जिल्हा भूमि अभिलेख प्रमुख

  जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, चंद्रपूर

 मुख्यालय

  चंद्रपूर

 कार्यालयाचा पत्ता

  खोली क्रमांक 24, दुसरा माळा, प्रशासकीय भवन,

   जिल्हा कोर्टाजवळ, चंद्रपूर

 दुरध्वनी क्रमांक

  07172-255414

 ईमेल आयडी

  dslrchandrapur@yahoo.in

 कार्यक्षेत्र

  संपुर्ण चंद्रपूर जिल्हा

 तालुकाची संख्या

  15

 दुय्यम कार्यालयाची संख्या

  15

 तालुका कार्यालयाची संख्या

  15

 तालुका कार्यालयाचे पदनाम

  उपअधीक्षक भूमि अभिलेख


चंद्रपुर नगरभूमापन

नगर भूमापन :-

              नगर भूमापन महसूल संहितेच्या तरतुदींनुसार सुरू करण्यात आलेल्या शहर सर्वेक्षणांच्या देखभालीसाठी आणि त्यांच्याशी जोडलेले अधिकार आणि नकाशे यासह अभिलेख आणि शहर भूमापन क्षेत्राच्या महसूल प्रशासनाला मदत करण्यासाठी परिरक्षण भूकरमापक हे कर्मचारी जबाबदार आहेत. सदरील कर्मचारी नगर भूमापन क्षेत्रात परिरक्षणाचे काम करतात.   चंद्रपूर जिल्ह्यातील खालील महत्त्वाच्या शहरांमध्ये व गावामध्ये  नागरी भूमापन सर्वेक्षण करण्यात आले असून त्याबाबत चा तपशील पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.तालुक्याचे नांवमिळकतींची एकूण संख्या
1 वरोरा 7614
2 चिमूर 8035
3 नागभीड 6363
4 ब्रम्हपूरी 10577
5 सावली 6375
6 सिदेंवाही 10053
7 भद्रावती 3149
8 चंद्रपूर 18780
9 मुल 12599
10 पोभुर्णा 1519
11 बल्लारपूर 5954
12 कोरपना 994
13 राजूरा 1333
14 गोंडपिपरी 4348
15 जिवती 91