जिल्ह्याची माहिती
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच हा जिल्हा प्रथम निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला आधी प्रभावतीनगर असे म्हणत. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील तेलंगणा राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. शिर्डी साईबाबा यांचा जन्म पाथरी येथला आहे.संत नामदेव महाराज (नर्सी), संत जनाबाई गंगाखेड व संत भोजलिंग काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी नृसिंह राजारामपंत कुळकर्णी उर्फ राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे. ञिधारा हे पवीञ ठिकाण येथे आहे.ञिधारेला ओॅंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
आता ते हिगोली जिल्हयात गेले आहे.
येलदरी धरण ता जिंतुर जि परभणी
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ५२.२० मी (सर्वोच्च)
लांबी : ४०८१.८० मी
दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : १४९.६५ मी.
सर्वोच्च विसर्ग : १०४७७.१३ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १०, ( ११.५८ X १२.४९ मी)
पाणीसाठा
क्षेत्रफळ : १०१.५४ वर्ग कि.मी.
क्षमता : ९३४.४४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ८०९.७७ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १०५६० हेक्टर
ओलिताखालील गावे : २७
कालवा
या धरणाचा कालवा सिद्धेश्वर धरणातून निघतो.
वीज उत्पादन
जलप्रपाताची उंची : ३८.१० मी
जास्तीतजास्त विसर्ग : १०.५० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १५ मेगा वॅट
विद्युत जनित्र : २ X ७.५० मेगा वॅट
परभणी जिल्हा भुमि अभिलेख
परभणी जिल्हा भुमि अभिलेख विभागाचे मुख्य कार्यालय जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख हे असुन हे कार्यालय प्रशासकीय इमारत तळमजला परभणी तालुका जिल्हा परभणी येथे आहे. जिल्हयातील इतर कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या कार्यालयाकडून केले जाते.सदर कार्यालयात मंजुर 9 पदे आहेत.जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख परभणी कार्यालयाच्या अधिनस्त उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी,पुर्णा,पालम,गंगाखेड,सोनपेठ,सेलु,मानवत,पाथरी व जिंतुर अशी 9 कार्यालये कार्यरत आहेत.
- जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख यांचे नाव- डॉ वसंत सदाशिव निकम.
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 02452-223275
- कार्यालयाचा ई-मेल आयडी- dslrparbhani@gmail.com
उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी जि परभणी
उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी हे कार्यालय प्रशासकीय इमारत पहिला मजला परभणी येथे कार्यरत आहे. सदर कार्यालयात एकुण 27 मंजुर पदे आहेत.
- उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी यांचे नाव- श्री दत्तु रामभाऊ सोनवणे
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 02452-220366
- कार्यालयाचा ई-मेल आयडी- dyslr_parbhani@yahoo.com
उप अधीक्षक भुमि अभिलेख पुर्णा जि परभणी
उप अधीक्षक भुमि अभिलेख पुर्णा हे कार्यालय प्रशासकीय इमारत ताडकळस रोड पुर्णा येथे कार्यरत आहे. सदर कार्यालयात एकुण 21 मंजुर पदे आहेत.
- उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी यांचे नाव- श्री साजिद युसुफ शेख
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 02452-255450
- कार्यालयाचा ई-मेल आयडी- purnadyslr@gmail.com
उप अधीक्षक भुमि अभिलेख पालम जि परभणी
उप अधीक्षक भुमि अभिलेख पालम हे कार्यालय प्रशासकीय इमारत लोहा रोड पालम येथे कार्यरत आहे. सदर कार्यालयात एकुण 18 मंजुर पदे आहेत.
- उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी यांचे नाव- श्री प्रदिपकुमार शंकरराव देशमुख
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 02453-270170
- कार्यालयाचा ई-मेल आयडी- d_palam@yahoo.in
उप अधीक्षक भुमि अभिलेख गंगाखेड जि परभणी
उप अधीक्षक भुमि अभिलेख गंगाखेड हे कार्यालय तहसिल परिसर कोद्री रोड गंगाखेड जि परभणी येथे कार्यरत आहे. सदर कार्यालयात एकुण 16 मंजुर पदे आहेत.
- उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी यांचे नाव- श्री साजिद युसुफ शेख (अतिरिक्त पदभार)
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 02453-222615
- कार्यालयाचा ई-मेल आयडी- dyslrgangakhed21@yahoo.com
उप अधीक्षक भुमि अभिलेख सोनपेठ जि परभणी
उप अधीक्षक भुमि अभिलेख सोनपेठ हे कार्यालय विटा रोड सोनपेठ जि परभणी येथे कार्यरत आहे. सदर कार्यालयात एकुण 14 मंजुर पदे आहेत.
- उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी यांचे नाव- श्री दत्तु रामभाऊ सोनवणे (अतिरिक्त पदभार)
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 02453-240141
- कार्यालयाचा ई-मेल आयडी- dyslr_sonpeth@yahoo.in
उप अधीक्षक भुमि अभिलेख सेलु जि परभणी
उप अधीक्षक भुमि अभिलेख सेलु हे कार्यालय तहसिल परिसर सेलु जि परभणी येथे कार्यरत आहे. सदर कार्यालयात एकुण 17 मंजुर पदे आहेत.
- उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी यांचे नाव- श्री किशोर शांताराम गायकवाड(अतिरिक्त पदभार)
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 02451-222957
3.कार्यालयाचा ई-मेल आयडी- dyslrselu@yahoo.com
उप अधीक्षक भुमि अभिलेख मानवत जि परभणी
उप अधीक्षक भुमि अभिलेख सेलु हे कार्यालय पाथरी रोड मानवत जि परभणी येथे कार्यरत आहे. सदर कार्यालयात एकुण 14 मंजुर पदे आहेत.
- उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी यांचे नाव- श्री किशोर शांताराम गायकवाड(अतिरिक्त पदभार)
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 02451-240102
- कार्यालयाचा ई-मेल आयडी- dyslrmanwat@gmail.com
उप अधीक्षक भुमि अभिलेख पाथरी जि परभणी
उप अधीक्षक भुमि अभिलेख पाथरी हे कार्यालय साई रोड पाथरी जि परभणी येथे कार्यरत आहे. सदर कार्यालयात एकुण 18 मंजुर पदे आहेत.
- उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी यांचे नाव- श्री किशोर शांताराम गायकवाड
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक-02451-255070
कार्यालयाचा ई-मेल आयडी- dyslr_pathari@yahoo.com
उप अधीक्षक भुमि अभिलेख जिंतुर जि परभणी
उप अधीक्षक भुमि अभिलेख जिंतुर हे कार्यालय तहसिल परिसर जिंतुर जि परभणी येथे कार्यरत आहे. सदर कार्यालयात एकुण 24 मंजुर पदे आहेत.
- उप अधीक्षक भुमि अभिलेख परभणी यांचे नाव- श्री प्रदिपकुमार शंकरराव देशमुख (अतिरिक्त पदभार)
- कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक-02457-220547
कार्यालयाचा ई-मेल आयडी- jinturdyslr@gmail.com
नागरी भमूापन विभाग नगर भमूापनाची प्रारंभिक माहिती :-
भमिू अभिलेख विभाग हा महसलु विभागाचा पाया असनु या विभागाने तयार केलेल्या जमीनीचे घर मिळकतीचे नगर भमूापन अभिलेखा आधारे राज्यातील विविध विभागाकडून विकासात्मक कामे करण्याची कार्यवाही केली जाते. मिळकत धारकांचे हक्क विषयक वादात निर्णय करणेत येतो. पर्यायाने या विभागाकडून तयार करण्यात आलेल्या अभिलेखाचे आधारे राज्यातील महसलुी उत्पन्नात वाढ होणेचे दृष्टीने वाटचाल होते.
कायदेशीर तरतुदी :-
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रकरण आठ कलम 121 ते 131 च्या तरतदुीनसुार गांवाचे /नगराचे /शहराचे नगर भमूापन केले जाते. कलम 126 नसुार नगर भमूापन मोजणी करणेत येते.
कोणत्याही गांव/नगर /शहरांचे नगर भमूापन करणेपुर्वी प्रथमत: नगर भमूापन हद्दीत कोणत्या जमीनी समाविष्ट करणे आवश्यक आहे याचा आढावा घेवून गांवाचा औद्योगिक विकास, गांवाची नागरीकरणाची वाढ इत्यादी बाबी तसेच इमारतीसाठी ज्या जमिनी लागण्याची शक्यता आहे याचा विचार करुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 122 च्या तरतुदीनुसार नगर भूमापनाची हद्द ठरविणेत येते.
नगर भूमापनाचे उद्देश :-
नगर भमूापनाचे प्रशासकीय, राजकोषीय व कायदा हे तीन उद्देश आहेत.
भूमि अभिलेख विभागाची पुनर्रचना :-
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना-1093/प्र.क्र.19/ल-1, दिनांक 18 ऑगस्ट 1994 अन्वये भूमि अभिलेख विभागाची पुनर्रचना करुन जिल्हा पातळीवर कार्यन्वित असलेली यंत्रणा तालुका पातळीवर कार्यन्वित करणेत आलेली आहे. त्यानुसार परभणी जिल्हयात 12 तालुका निरीक्षक भूमि अभिलेख कार्यालये निर्माण करणेत आली. हिंगोली जिल्हा विभाजनानंतर परभणी जिल्हयात सदयस्थितीत 9 तालुका कार्यालये / उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालये कार्यन्वित आहेत. त्याअंतर्गत एकूण 71 नगर भूमापन झालेली गावे आहेत. सन 1982 मध्ये तालुका स्तरावरील परभणी नगर परिषद हददीतील नगर भूमापन काम पूर्ण झालेले आहे.