जिल्ह्याची माहिती

सोलापूर जिल्ह्यावर एक दृष्टीक्षेप

भौगोलिक रचना

भौगोलिकदृष्टया सोलापूर हे 17.10 ते 18.32 उत्तर अक्षांश आणि 74.42 ते 76.15 डिग्री पूर्वे रेखांशावर वसलेले आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण पूर्वेला आहे. आणि संपूर्ण्पणे भीमा आणि सीना नदीच्या खो-यामध्ये आहे.संपूर्ण् जिल्हा भीमा व तिच्या उपनदया यांचेव्दारे पिकासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा होतो.

भौगोलिक क्षेत्रफळ

सोलापूर  जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ

क्षेत्रफळ चौ.कि.मी.

सोलापूर क्षेत्र

14844 चौ.कि.मी.

भौगोलिक रचना

सोलापूर  जिल्ह्याचे भौगोलिक स्थान

स्थान पदवी

उत्तर उंची

17.10 ते 18.32 डिग्री

पूर्व उंची

74.42 ते 76.15 डिग्री

तापमान आणि पर्यजन्यमान

सोलापूर जिल्ह्यातील हवामान आणि पाऊस

पाऊस / हवामान

जिल्ह्यातील सरासरी पाऊस

७५० ते१००० मिमी

किमान तापमान

३५.५ अंश सेल्सियस

कमाल तापमान

४५.९अंश सेल्सियस

 

ओलीत अंतर्गत क्षेत्रफळ

सोलापूर जिल्ह्यातील ओलीत अंतर्गत क्षेत्रफळ

क्षेत्रफळ

   क्रषी  क्षेत्र

114.80 चौ कि मी

लागवडी वापराज नाही असे क्षेत्र

380 चौ कि मी.

बिगर क्रषी   क्षेत्र

690 चौ कि मी.

 

सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या(२०११)जनगणना अहवाल नुसार

लोकसंख्या

एकूण

43,17,756

पुरुष

2,227,852

स्त्री

2,089,904

साक्षरता प्रमाण(२०११)

सोलापूर जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण(२०११)जनगणना अहवाल नुसार

साक्षरता प्रमाण

एकूण

77.02 %

पुरूष

85.03 %

स्त्री

68.55 %


सोलापूर नगरभूमापन

              नगर भूमापन महसूल संहितेच्या तरतुदींनुसार सुरू करण्यात आलेल्या शहर सर्वेक्षणांच्या देखभालीसाठी आणि त्यांच्याशी जोडलेले अधिकार आणि नकाशे यासह अभिलेख आणि शहर भूमापन क्षेत्राच्या महसूल प्रशासनाला मदत करण्यासाठी परिरक्षण भूकरमापक हे कर्मचारी जबाबदार आहेत. ती परिरक्षण भूकरमापक हे काम करतात.  सोलापूर जिल्ह्यातील खालील महत्त्वाच्या शहरांमध्ये व शहरांमध्ये प्रत्येकाच्या तुलनेत असे सर्वेक्षण सुरू करण्यात आले त्याबाबत चा तपशील पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.

तालुक्याचे नांव

नगर भूमापन सुरू झालेचे   वर्ष

मिळकतींची एकूण संख्या

1

नभूअ,सोलापूर

1908 ते 1994 टिपी.1ते5         

   34671 

2

उत्तर सोलापूर

सन 1986

   12868

3

दक्षिण सोलापूर

सन 1986

   19045

4

अक्कलकोट

सन 1956

26326

5

बार्शी

सन 1920 व 1986

 36155

6

माढा

सन 1986

29160

7

मोहोळ

 सन 1970 व 1986                       

21689

करमाळा

  सन 1986           

21751

 पंढरपूर 

 सन 1920 व 1986

32345

10 

सांगोला

सन 1986 

22261 

11

 मंगळवेढा

सन 1986

16049

12

 माळशिरस

 सन 1986 

29651

 


सोलापूर जिल्यातील भूमी अभिलेख विभागाने साध्य केलेली प्रमुख कामगिरी
  • जिल्ह्यातील भूमि अभिलेख विभागाने साध्य केलेली प्रमुख कामगिरी

CORS

        सोलापूर जिल्ह्रयामध्ये एकूण 5 ठिकाणी कॉर्स स्टेशन उभारणी करणेत आलेली आहेत.  उप अधीक्षक

        भूमि अभिलेख अक्कलकोट, मोहोळ, करमाळा, मंगळवेढा, माळशिरस या ठिकाणी सदरचे कॉर्स स्टेशन

        उभारणी करणेत आलेले असून ती सध्या कार्यरत स्थितीत आहेत. 

  • कॉर्स हे रोव्हर्स नेटवर्कसाठी बेस टॉवर्स असतील जे प्रशासनाला मोजमाप करून प्रकरणांची शुन्य प्रलंबितता प्राप्त करण्यास मदत करतील. त्यामुळे मोजणी काम अचूक आणि जलद होणेस मदत होईल. ज्यामुळे मापनातील छेडछाड रद्द होईल. कॉर्स हे रोव्हर्स नेटवर्कसाठी बेस टॉवर्स असतील जे प्रशासनाला मोजमाप प्रकरणांची शुन्य प्रलंबितता प्राप्त करण्यास मदत करतील.
  • Svamitva Schem -

महाराष्ट्र शासन निर्णय क्र.संकीर्ण -2018/प्र.क्र.13/मातंक/ दिनांक 22/02/2019 अन्वये राज्यातील गांवठाण जमाबंदी प्रकल्पास मान्यता देणेत आलेली आहे. राज्यातील सर्व गावांच्या गांवठाणातील जमिनीचे GIS आधारीत सर्वेक्षण व भूमापन करणेबाबतची योजना, योजनांतर्गत योजना म्हणून राबविण्यास शासनाची मंजूरी देणेत आलेली आहे.यामुळे पुढील प्रमाणे फायदे होतील.

  • शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होईल.
  • मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील. तसेच मिळकतींचे नेमके क्षेत्र माहित होईल.
  • मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका ( Property Card ) तयार होईल.
  • ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होईल.
  • गांवातील रस्ते शासनाच्या / ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सिमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल.
  • मिळकत पत्रिका ( Property Card ) तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेणेचे सुविधा उपलब्ध होईल.
  • ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी ,बाधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल.
  • गांवठाणाचे हद्दीतील ग्रामपंचायत मिळकती, शासनाच्या मिळकती, व सार्वजनिक मिळकती / जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सिमा व क्षेत्र निश्चित होतील. व जनतेस माहितीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे गांवठाणातील मिळकतींचे हद्दी व क्षेत्राचे वाद कमी प्रमाणात उद्भवतील.

गांव पातळीवरचे नियोजन हे ख-या अर्थाने ग्रामस्वराज्य साध्य करण्यासाठी आणि ग्रामिण भारत आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकेल.

इकडील जिल्ह्यामध्ये ड्रोन फ्लाईंगचे कामाबाबतची माहिती दर्शविणारे पत्रक

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

एकूण गांवे

ड्रोन फ्लाईंग पुर्ण गांवे

1

उप अ.भू.अ. उत्तर सोलापूर

21

21

2

उप अ.भू.अ. दक्षिण सोलापूर

53

53

3

उप अ.भू.अ. अक्कलकोट

101

0

4

उप अ.भू.अ. बार्शी

86

0

5

उप अ.भू.अ. माढा

86

48

6

उप अ.भू.अ. मोहोळ

73

73

7

उप अ.भू.अ. करमाळा

78

78

8

उप अ.भू.अ. पंढरपूर

60

60

9

उप अ.भू.अ. सांगोला

48

48

10

उप अ.भू.अ. मंगळवेढा

60

60

11

उप अ.भू.अ. माळशिरस

49

0

 

एकूण बेरीज

715

441

 

  • स्वामित्व योजने अंतर्गत सनद फी बाबतचे माहिती पत्रक

स्वामित्व योजने अंतर्गत उप अधीक्षक भूमि अभिलेख, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या कार्यालयातील गांवांचे सनदा तयार झालेल्या आहेत.

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

एकूण सनद तयार होऊन प्राप्त गांवांची संख्या

एकूण प्राप्त सनदांची संख्या

वाटप करणेत आलेल्या सनदांची संख्या

वाटप करणेवर सनदांची संख्या

 

एकूण

डिमांड

 

वसुल झालेली सनद फी

वसुलीवर शिल्लक सनद फी

 

1

उप अ.भू.अ. उत्तर सोलापूर

12

2105

468

1637

1149196

252132

897064

2

उप अ.भू.अ. दक्षिण सोलापूर

18

2743

723

2020

1512336

334670

1177666

 

एकूण बेरीज

30

4848

1191

3657

2661532

586802

2074730


सोलापूर प्रशासकीय रचना

प्रशासकीय संरचना 

जिल्हा भूमी अभिलेख प्रमुख

जिल्हा अधीक्षक भूमी  अभिलेख, सोलापूर

मुख्यालय

सोलापूर

कार्यालयाचा पत्ता

मा जिल्हाधिकारी परिसर, कपौंड सोलापूर

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर

सोलापूर - 413001

संपर्क क्रमांक

0217 -2627898

ई मेल आयडी

dslrsplr @gmail.com
 

अधिकार क्षेत्र

  संपुर्ण जिल्हा 

तालुक्यांची संख्या

   11 

अधिस्त  अधिकारी  संख्या

   12

तालुकास्तरावरील कार्यालयांची संख्या

   12

तालुका येथील कार्यालयाचे पदनाम                        

  उप अधीक्षक भूमि  अभिलेख  /नगरभूमापन     अधिकारी