०२०-२५७१२७१२
Maharashtra gov logo
मुख्य विषयांकडे जा दिशादर्शक जुने संकेतस्थळ
०२०-२५७१२७१२
कैरेमल
निसर्ग
समुद्र
हिरवा
निळा

सेवानिवृत्त लेखापाल - रोखपाल - लेखाधिकारी यांची आवश्यकतेनुसार करार पध्दतीने नियुक्ती करण्याकरीता अर्ज मागविणेबाबत.

सेवानिवृत्त लेखापाल - रोखपाल - लेखाधिकारी यांची आवश्यकतेनुसार करार पध्दतीने नियुक्ती करण्याकरीता अर्ज मागविणेबाबत.

लेखाविषयक कामकाजाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त रोखपाल/लेखापाल/लेखाधिकारी यांची करार पध्दतीने नियुक्ती १ वर्षाकरीता आवश्यकतेनुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे येथे करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर नियुक्ती सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: सीबीई १५२५/प्र.क्र.३७/ आस्थामं (का. १३) मंत्रालय, मुंबई दिनांक १०/०६/२०२५ मधील तरतुदीनुसार करण्यात येत आहे.

अधिक माहिती जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे यांचे संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक व्यक्तींनी वेबसाईटवरील माहिती, अटी व शर्ती, कार्य-कर्तव्ये व अर्जाचे अवलोकन करून अर्ज सादर करावेत.

जहिरातीच्या (२८/०१/२०२६) दिनांकापासून  १५ दिवसांत अर्ज सादर करावा.



संलग्न फाइल : ( ) Download File