भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती २०२५ - कोकण प्रदेश मुंबई
सरळसेवा भरती २०२५ (गट क भूकरमापक संवर्ग)
उपसंचालक भूमि अभिलेख,कोकण प्रदेश, मुंबई यांच्या अधीनस्त विभागातील गट-क, भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दि. १३/११/२०२५ व १४/११/२०२५ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेस (Computer Based Test) उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे.
जाहिरातीत नमूद पदांच्या अनुषंगाने १ : ५ या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकामी बोलविण्यात येणार असून कागदपत्रे पडताळणीकामी निवडलेल्या उमेदवारांची यादी https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच सदर यादीसोबत पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक त्या सविस्तर सुचनादेखील प्रसिद्ध करण्यात येतील. पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवाराला त्यांने परीक्षेसाठी नोंदणी अर्जात नोंदविलेल्या ई-मेल आय डी व भ्रमणध्वनी क्रमांकावर अवगत करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.