आस्थापना व लेखा शाखा
जमाबंदी आयुक्त कार्यालयातील आस्थापना व लेखा या शाखांमार्फत भूमि अभिलेख विभागाच्या राज्यातील आस्थापना व लेखा विषयक बाबीवर कार्यवाही केली जाते. राज्यामध्ये भूमि अभिलेख विभागामध्ये गट-अ (वर्ग-१) संवर्गातील ५२ अधिकारी, व गट-ब (वर्ग-२) संवर्गातील ४३१ लेखा अधिकारी १ = ४३२ अधिकारी आहेत. तसेच कर्मचाऱ्यांची एकूण संख्या वर्ग-३ = ६५६० व वर्ग-४ = २६४४ आहे.
विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या खालील नमूद सेवा विषयक बाबींवर आस्थापना शाखेकडून कार्यवाही करण्यात येते. त्याचप्रमाणे भूमि अभिलेख विभागामध्ये वर्ग ३ पदसमूह ४ मध्ये नव्याने नियुक्ती करण्यासाठी भरती प्रक्रीयेची कार्यवाही या शाखेकडून करण्यात येते. भूमि अभिलेख विभागाचा अर्थसंकल्प, अंदाजपत्रक, विभागातील सर्व कार्यालयांचे अंतर्गत लेखा परीक्षण करणे व इतर लेखा विषयक बाबींबाबत लेखा शाखेकडून कार्यवाही करण्यात येते.
आस्थापना शाखा
आस्थापना या शाखेकडून, विभागाचा आकृतीबंद निश्चित बाबत कार्यवाही, गट-अ ते गट-क पदांचे सेवा प्रवेश नियम अद्यावतीकरण, वर्ग-१, वर्ग-२ अधिकाऱ्यांची पदोन्नती, बदली, रजा, परिविक्षाधिन कालावधी समाप्ती, सेवा निवृत्ती, स्वेच्छा सेवा निवृत्ती, पदभार हस्तांतरण, ५०-५५ पुनर्विलोकन, गोपनीय अहवाल, सांविधानिक अधिकार, आश्वासित प्रगती योजना, ज्येष्ठता याद्या प्रसिध्द करणे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठविणे, प्रतिनियुक्ती, मानिव दिनांक प्रकरणा बाबत कार्यवाही करणे, न्यायालयीन प्रकरणांबाबत कार्यवाही करणे, विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची विभागीय चौकशी प्रकरणे हाताळणे, अधिकारी/कर्मचारी यांना घर खरेदी, वाहन खरेदी इत्यादीस परवानगी देणे, गट-क पदसमूह ४ ची सरळसेवा भरती, गट-क व गट-ड अनुकंपा भरती, विभागातील कर्मचारी यांना सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण देणे, भूमि अभिलेख अर्हता परिक्षा घेणे इ. सेवा विषयक बाबींवर कार्यवाही केली जाते.
लेखा शाखा
कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवानिवृत्ती लाभांचे आहरण व संवितरण करणे, कंत्राटी सेवा, किरकोळ व आकस्मिक खर्च, तसेच दूरध्वनी, वीज व प्रवास भत्ता देयकांबाबत कार्यवाही करणे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती प्रकरणे, आयकर व GST संबंधित कामकाज, भविष्य निर्वाह निधी अग्रिम मंजुरी व त्यासंदर्भातील पत्रव्यवहार, बँक व रोख व्यवहारांचे संचालन आणि खात्यांचा ताळमेळ राखणे. रोख नोंदवही व जड वस्तू संग्रह नोंदवही अद्ययावत ठेवणे. विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे, मासिक खर्च पत्रके, अनुदान वितरण, विनियोजन लेखे, पुरवणी अनुदान व समर्पित अहवाल तयार करणे. शासकीय वाहन खरेदी, वाटप, दुरुस्ती व निर्लेखन करणे, तसेच सर्व प्रकारची अग्रिमे, ठेव संलग्न विमा, अपंग भत्ता व वैद्यकीय बिल/बीले यांची प्रक्रिया पार पाडणे. कार्यालयांचे बांधकाम, स्थलांतर व खाजगी इमारत भाडे प्रस्तावांबाबत कामकाज करणे. महसूली जमेचा ताळमेळ व अंतर्गत लेखापरीक्षण करणे, तसेच महालेखापाल नागपूर यांनी केलेल्या महसूल लेखापरीक्षण अहवालांवरील पत्रव्यवहार व अनुपालन करणे. स्वीय प्रपंजी लेखा खात्यासंदर्भातील सर्व वित्तीय कार्यवाही पार पाडणे.
माहिती तंत्रज्ञान शाखा
भूमि अभिलेख विभागाकडील अधिकार अभिलेख संबधीत माहिती वेगवेळया बॅका, विमा कंपन्या तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालयांना API व्दारे उपलब्ध करुन देणे, भूमि अभिलेख विभागामध्ये राबविण्यात येणा-या नाविन्य पूर्ण योजनांसाठी आवश्यक सॉफ्टवेअर व हार्डवेअर सुविधा, भूमि अभिलेख विभागात कार्यान्वीत असलेल्या प्रणालीच्या विकासाकरीता आवश्यक तांत्रिक मुनष्यबळ पुरविणे, विभागाच्या विविध प्रणालीसाठी आवश्यक डेटा संधारण, सुरक्षा आणि होस्टींग आवश्यकता लक्षात घेता संबधीत क्लाउड सेवा पुरविणे, सर्व प्रकारचे बाह्य मनुष्यबळ सेवा पुरवण्याबाबत व्यवस्थापन करणे.